Tuesday, November 30, 2021

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या थोबाडीत दिली असती

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत दिली असती, असा घणाघात शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये भाजपची बडी मंडळी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आली आहेत. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा येथील कथित घटनेवर महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादावरून शिवसेनेला घेरले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी

रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल केला होता. पाटील यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला.

ते म्हणाले, संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. आज स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती, अशी घणाघाती टीका केली.

पाटील पुढे म्हणाले की, राज्य करा. मुस्लिमांची मतं मिळवा. कोण नाही म्हणतंय. 5 टक्के मुस्लिम गडबड करतात. 95 टक्के प्रामाणिक आहेत. मालेगावमध्ये,नांदेडमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यावर पूर्वी सारखी टीका करा. फक्त मुस्लिम मतांची काळजी करू नका.

5 टक्के मुस्लिम गडबड करतो, त्यावर तुम्ही टीका पण नाही का करणार ?, असा सवाल त्यांनी केला. त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत ही परंपराच आहे ना. मग हा निषेध शांततेत करा इतकंच. अमरावतीचा कालचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा.

माजी मंत्री जगदीश गुप्तांचे ऑफिस फोडले गेले की नाही? सामान्य माणसाचे ऑफिस फोडले गेले की नाही? आज बंदवर पोलीस लाठ्या चालवतील. मात्र, काल ज्यांनी दुकान फोडले त्यांच्यावर लाठ्या का नाही चालवल्या, असा सवालही पाटील यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!