Wednesday, December 8, 2021

पुन्हा संकट:उद्यापासून आठ दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :खरिपाचे तर पावसाने नुकसान झालेच आहे पण यंदा रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय येत आहे. राज्यात पुन्हा उद्यापासून (रविवार) आठ दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा

अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे खरिपातील तूर आणि कापसावरचा धोका हा कायम आहे तर रब्बीच्या पेरण्या अणखीन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर पंधरा दिवसांनी अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी

दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने पावसाचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे शेतीव्यवसयाचे चक्रच बदलते की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे.हवामानाच्या अचानक बदलामुळं रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या ढगाळ वातावरणाचा आणि पावसाचा परिणाम हा मुख्यत्वे शेती व्यवसायवर होणार आहे. कारण अजूनही खरिपातील तूर आणि कापूस

ही मुख्य पिके वावरातच आहेत. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार असून किडीचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस हा नुकसानीचाच ठरणार आहे.नोव्हेंबर महिन्याचा पंधरवाडा उलटला तरी केवळ ज्वारी आणि करडईचीच पेरणी झालेली आहे.

तर गहू, हरभरा या पिकांचा पेरा अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीची गडबड न करता वातावरण निरभ्र झाल्यावरच पेरणी करावी अन्यथा पेरणी करुनही मोडणी करण्याची नामुष्की ओढावणार असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...
error: Content is protected !!