भेंडा
श्रीरामाचे नामस्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही राम नाम जपाने करावी असे प्रतिपादन नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीराम कथेचे तिसरे पुष्प गुंफताना नंदकिशोर महाराज नेवासेकर बोलत होत .
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग ,काशीनाथ नवले,अशोकराव मिसाळ,गणेश गव्हाणे ,अजित मुरकुटे ,बबनराव धस,डॉ.लहानु मिसाळ आदि यावेळी उपस्थित होते.
नंदकिशोर महाराज पुढे म्हणाले की,दक्षिणमुखी मारुतीरायांच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. संत, योगी, महात्मे ,संन्यासी यांना सर्वांना आनंद देणारी कथा म्हणजे राम कथा.मानवी जीवनातील अचार कसे असावे हे रामकथा शिकवते. राम कथा संपूर्ण जगाला पावन करणारी कथा आहे. देवाला तुळशीची माळ घालणारा व्यक्ती प्रिय असते.तुळस ही अत्यंत पवित्र आहे, घरासमोर तुळशीचे वृंदावन असली पाहिजे. आई-वडील, सद्गुरूंची जो सेवा करत नाही त्यांना जीवदान दुःख येते. जो आई-वडिलांची सेवा करतो त्याला काहीही कमी पडत नाही. दानधर्म ,भजन नाही केले तर मनुष्य सैराभैर होतो.मानव जातीचे कल्याण करणारी गाय ही माता आहे.गोमाताची ही सेवा केली पाहिजे.मोकळे मनाचे माणूस हा नेहमी निरोगी असतो. घरातील लहान मोठे यांनी सर्वांनी राम कथेची श्रवण केली पाहिजे. कथा श्रवण केल्याने जीवनाचा उद्धार होतो असे नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी सांगितले.
*राम जन्म सोहळा साजरा…*
कथेच्या तिसऱ्या दिवशी राम जन्म सोहळा पार पडला. यावेळी फुलांची पुष्पवृष्टी करत महिला भगिनी तसेच भाविकांनी फुगड्या खेळत या राम जन्म सोहळ्याचा आनंद लुटला. राम जन्म सोहळ्यासाठी मोठी गर्दी झाली होती राम जन्म सोहळ्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली
दक्षिणमुखी मारुतीच्या दर्शनाने ऊर्जा मिळते-नरेंद्र घुले
भेंडा येथील दक्षिणमुखी मारुतीरायांच्या दर्शनाने आम्हाला मोठी ऊर्जा मिळते .या दर्शनाने नेहमीच सकारात्मक कामे मार्गी लागतात. परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्य करत राहिले पाहिजे.श्रीराम सेवा मंडळ निस्वार्थीपणे काम करत आहे.
-माजी.आ.नरेंद्र घुले पाटील