Friday, December 3, 2021

ज्ञानेश्वर कडून प्रतिटन 2 हजार 411 रुपये ऊस भाव जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या ऊस वजन काटा बंद आंदोलनाला यश आले असून लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 2 हजार 411 रुपये भाव जाहीर केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे,
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे,शेवगाव तालुका अध्यक्ष प्रशांत भराट,नेवासा तालुकाध्यक्ष दादासाहेब नाबदे,मच्छीन्द्र आरले,स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, संदीप मोटकर,अशोक पावसे,भाऊ बैरागी, माऊली मुळे, चंद्रकांत सरगड, नारायण पायघन, अशोक भोसले, अमोल देवढे यांचे नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी ऊसाला प्रतिटन 3300 रुपये भाव द्यावा, एक रकमी एफआरपी द्यावी,साखरेचा दर वाढल्याने मागील हंगामात गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन 150 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळावे,वजन काट्यातील काटेमारी बंद करावी,ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास कारवाई करावी,पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळपास प्राधान्य द्यावे या आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यावर ऊस वजन काटा बंद करून कारखाना बंद पडण्याचे आंदोलन हाती घेतलेले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दि.13 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 पासून सकाळी 10 वाजेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऊस वजन काट्यावर ठिय्या आंदोलन करून काटा बंद पडला.कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,संचालक शिवाजीराव कोलते,अशोकराव मिसाळ,मच्छीन्द्र म्हस्के,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.कारखाना व्यवस्थापन प्रतिटन 2400 रुपये तर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते 2500 रुपयांवर ठाम राहिल्याने उभय पक्षात काही वेळ चर्चेच्या फेऱ्या सुरूच राहिल्या.चर्चे अंती कारखाना व्यवस्थापनाने एफआरपी पेक्षा 11 रुपये जास्त देत प्रतिटन 2411 रुपये एकरकमी ऊस दर देण्याचे घोषित केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना व्यवस्थापनाने ऊस दराबाबद गघेतलेल्या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे स्वतः पहाटे पासून आंदोलन स्थळी हजर होते.उपनिरीक्षक नितीन पाटील,उपनिरीक्षक समाधान भाटेवाल
यांचेसह पोलिस कर्मचऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवला.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!