Tuesday, November 30, 2021

नगर ब्रेकींग: सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने या ठिकाणी मोठा तणाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका धर्मगुरुच्याबद्दल सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमनेरात तणाव परिस्थिती निर्माण झाली असून एका समाजाच्या जमावाने शहर पोलीस ठाण्यात गर्दी करत संबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी

करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे संगमनेरात तणावग्रस्त वातावरण निर्मिती झाली आहे.सोशल मीडियावर एका समाजाच्या धर्मगुरुबाबत वादग्रस्त पोस्ट आल्याने दिल्ली नाका येथे एका समाजाच्या लोकांनी गर्दी केली. त्यानंतर सदर जमाव पोलीस ठाण्यावर आला.

ही माहिती तालुक्यात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर तालुक्यातूनही काही लोक पोलीस ठाण्यात आले. तेथे आल्यानंतर जमावाने एकच घोषणाबाजी केली. आरोपींना अटक करा, तरच आम्ही येथून उठू, अशी मागणी त्यांनी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन

जादा पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे. संगमनेर शहर व तालुका पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पोलीस ठाण्यात हजर झाले.जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत होता. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर सदर समाजाच्या

काही व्यक्तींनी पोलीस प्रशासनास सांगितले की, आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही येथून हटणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु केले. मात्र जमाव पोलीस ठाण्यातच ठाण मांडून आहे.

जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. संगमनेरातील हा तणाव पाहता आजी माजी नगरसेवक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतांना देखील वातावरण काही शांत होत नाही. आम्हाला आरोपी समोर आणा, अशी मागणी सदर जमावाने केली.

शहरात पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!