Friday, December 3, 2021

गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्यांनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये-मंत्री तनपुरे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :केंद्रातील सत्तेचा वापर राज्यातील मंत्र्यांच्या मागे चौकशी लावून सरकार अस्थिर करून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र काही झाले तरी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षाचा कार्यकाळ

निश्चित पूर्ण करणार असल्याचा विश्वास ऊर्जा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी व्यक्त केला.नामदार प्राजक्त तनपुरे हे तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच पत्रकारांचा

सन्मान व गावातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुरेश झुगे हा होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, रवींद्र आढाव, भारत तारडे, सुभाष डुक्रे, युवा नेते अनिल इंगळे, दिलीप इंगळे, रामदास वने आदि प्रमुख उपस्थित होते.

नामदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी आपल्या भाषणात मंत्री झाल्यापासून देशात सर्वत्र कोरोना महामारीने वेधले होते. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून सुद्धा विकास कामे करता आली नाही. आता कोरोना थोडा कमी जरी झाला.

तरी तिसऱ्या लाटेच्या भीतीने सरकार अजूनही चिंताग्रस्त आहे. कोरोनाच्या काळात जे काही लसीकरण झाले. त्यामुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. आज सर्वत्र १०० कोटी लसीकरण केल्याचा ढिंडोरा फिटला जात आहे. काही जण तर त्या

काळात कुठलेही काम न करता लसीकरण केंद्रा जवळ फ्लेक्स लावून श्रेय घेण्यासाठी पळत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आचार संहिता लागू होणार होती. पण ती निवडणूक स्थगित झाल्याने आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्याचे स्वप्न भंग झाले. गुडघ्याला

बाशिंग लावून बसलेल्यांनी आमदारकीचे स्वप्न पाहू नये. जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ताच आमदार होणार असल्याचे नामदार तनपूरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!