Friday, December 3, 2021

न्यायालयाचा मोठा निर्णय:शारीरिक संबंधांसाठी पूर्वी घेतलेली संमती भविष्यातील लैंगिक संबंधासाठी लागू होत नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणातील सुनावणीदरम्यान मोठा निर्णय देत आरोपीची जामीन याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने प्रतिपादन करताना म्हटले की, सुरुवातीला हे दोघांच्याही संमतीने प्रस्थापित केलेले नाते होते.

दोन व्यक्तींनी यापूर्वी कोणत्याही कारणास्तव संमतीने लैंगिक संबंध ठेवले होते, असे गृहीत धरले तरी, पूर्वीच्या लैंगिक कृत्यांची संमती भविष्यातील लैंगिक कृत्यांसाठी गृहीत धरली जाणार नाही. म्हणजेच याआधी जरी दोघांच्याही संमतीने शारीरिक

संबंध ठेवले असले तरी, भविष्यात लैंगिक संबंध ठेवताना आधीची संमती ग्राह्य धरली जाणार नाही.पीएस सेक्टर 40, गुरुग्राम येथे एका व्यक्तीवर आयपीसीच्या बलात्कार, घुसखोरी आणि गुन्हेगारी धमकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता या याचिकाकर्त्याने (आरोपी) आपल्या वकिलामार्फत असा युक्तिवाद केला आहे की, एफआयआर दाखल करण्यास 48 दिवसांचा विलंब झाला होता. तक्रारदार 35 वर्षीय घटस्फोटित आहे आणि ‘अयशस्वी प्रेमसंबंधातून खंडणी घेण्याच्या

कुटील हेतूने’ खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्याने पुढे सांगितले की तो आणि तक्रारदार दोघेही प्रौढ आहेत आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. रेकॉर्डवर असलेल्या छायाचित्रांवरून ते स्पष्ट होत आहे व त्यांच्यातील संबंध परस्पर सहमतीने होते. वकिलांनी या व्यक्तीच्या

जामीन अर्जाला विरोध करताना असा युक्तिवाद केला की, याचिकाकर्त्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत, याचिकाकर्त्याला केवळ दोन महिने आणि नऊ दिवसांची कोठडी मिळाली आहे, चालान सादर करण्यात आले आहे.

परंतु अजूनही फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे तूर्तास तरी दोन्ही पक्षांमध्ये सहमतीपूर्ण संबंध होते असा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही.न्यायमूर्ती पुरी म्हणाले, ‘कायदा लिव्ह-इन नातेसंबंध मान्य करतो, परंतु त्याच वेळी, हे देखील लक्षात घेतले

पाहिजे की कायद्याने स्त्रीला लैंगिक संबंध ठेवण्याचा अधिकार देखील मान्य केला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात संमतीशिवाय किंवा एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध ‘लैंगिक कृत्य’ करणे समाविष्ट आहे. जरी दोन व्यक्तींनी पूर्वी कोणत्याही कारणास्तव संमतीने

लैंगिक संबंध ठेवले असले तरी, पूर्वीच्या लैंगिक कृत्यांची संमती भविष्यातील प्रसंगांनाही मिळते असे नाही. आधीची संमती म्हणजे आरोपीला फिर्यादीचे कायमचे शोषण करण्याचा अधिकार मिळतो, असे नाही.

ते पुढे म्हणाले, ‘आधी दिलेली संमती भविष्यात नाकारल्यास ती पूर्वीची संमती प्रभावीपणे रद्द होते आणि त्याठिकाणी कलम 376 च्या दंडात्मक तरतुदी लागू होण्याच्या शक्यता वाढतात. ज्याचा अर्थ संमतीशिवाय जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे असा आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याची जामीनाची सवलत नाकारली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!