Wednesday, December 8, 2021

साईमंदिरात गर्भवती महिलांना व वयोवृद्धांना दर्शन मिळणार पण…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. यामध्ये जास्तीत जास्त संख्या ६५ वर्षापुढील भाविकांची असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील दोन वर्षापासून करोनाचा

वाढता प्रादुर्भाव याकारणास्तव राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद केली होती. करोनाची पहिली लाट ओसरताच दि.१९ नोव्हेंबर २०२० रोजी श्री साईमंदीराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर चार महिन्यातच करोनाची

दुसरी लाट उसळली आणी पुन्हा दुस-यांदा संस्थानच्या इतिहासात ५ एप्रिल २०२१ रोजी साईमंदीराचे दरवाजे बंद करण्यात आले.करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिर्डी येथील साईमंदीरात गर्भवती महिला व ६५ वर्षे वयोगटापुढील भाविकांना दर्शनासाठी करण्यात

आलेली प्रवेश बंदी उठवण्यात आली असून कोव्हीड लसिकरणाचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच साईसमाधीचे दर्शनासाठी प्रवेश मिळेल अशी माहिती साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.केंद्र सरकारने करोनाचे

लसिकरण जास्तीत जास्त वेगाने व्हावे यासाठी लसिकरणाची संख्या वाढवून देत लसिकरण मुक्त भारत या दिशेने वाटचाल सुरू करून शंभर कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे करोनापासून मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. एकंदरीतच

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने घटस्थापनेला राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी खूली करून दिली होती. परंतु यामध्ये ६५ वर्षे वयोगटापुढील तसेच १० वर्षाच्या आतील लहान मुलांना आणी गर्भवती महिला भाविकांना साईमंदीरात दर्शनासाठी प्रवेश बंदी घालण्यात आली होती.

मात्र सदरची प्रवेश बंदी उठविण्यात आली असली तरी देखील १० वर्षाच्या आतील लहान मुलांना साईमंदीरात दर्शनासाठी अद्यापही प्रवेश बंदी असल्याचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!