Friday, December 3, 2021

कांद्याची आयात दरात घसरण; साठवणूक करुनही कवडीमोल दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने साठवणुकीतला कांदा विक्रीसाठी बाहेर काढला होता. तसेच वेळप्रसंगी कांद्याची आयात करुन दर नियंत्रणात आणले जातील असेही गतआठवड्यात स्पष्ट केले होते.

त्यानुसार आता इराण, तूर्की , अफगाणिस्थानसह इतर देशातून कांदा आयात करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे.दर वाढीने कधी ग्राहकांच्या डोळ्यात तर कधी रात्रीतून दर कोसळल्याने

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याच्या दरावर सरकारच्या निर्णयाचा परिणाम झालेला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात रहावे म्हणून कांद्याची आयात करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. याचा थेट परिणाम आता कांद्याच्या दरावर जाणवू लागला आहे.

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तब्बल 625रुपयांची घसरण झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याला दर नव्हता म्हणून त्याची कांदा चाळीत साठवणूक केली होती. शिवाय मध्यंतरी पावसामुळेही साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले होते. आता कुठे दर वाढत असताना उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

त्यानुसार दरही वाढत होते. मात्र, आता कांद्याच्या आयातीला परवानगी दिल्याने दरात मोठी घसरण होऊ लागली आहे. गेल्या सहा महिन्यापासून योग्य दराच्या प्रतिक्षेत साठवणूक केली मात्र, सरकारच्या एका निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारपर्यंत लासलगाव येथील बाजारपेठेत कांद्याला चांगला दर होता. मात्र, कांद्याच्या आयातीला सुरवात होताच दरात घसरण सुरु झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी 625 रुपयांची घसरण झाली होती.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!