Wednesday, December 8, 2021

तर सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांचे पद रद्द होणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात बालविवाह रोखण्यासाठी आता राज्य महिला आयोग सक्रिय झाला आहे. ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना जबाबदार धरून

त्यांचे पद करण्यात यावे असे पत्र राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.ज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय झाले आहे. यासाठी राज्य महिला आयोगाने एका नवीन नियम

लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे.राज्यात बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता बालविवाह

रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. राज्यात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसे सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी. गावात

अशा प्रकारची घटना घडली तर त्यांचे पद रद्द करण्यात यावे. ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मध्ये करावी व बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांचे पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

सर्वाधिक बालविवाहप्रमाण बीड, औरंगाबाद, नगर, परभणी, सोलापूर, जालना, बुलढाणा जिल्ह्यांत आहे. मागील दोन वर्षात राज्यात ९१४ बालविवाहच्या घटना रोखण्यात आल्या. ऐकून ८१ घटनांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले. परंतु ही आकडेवारी

नोंद झालेली आकडेवारी आहे. ज्याची नोंदचा झाली नाही अशी आकडेवारी मोठी आहे. वयाच्या १४-१५ व्या वर्षीचा बाळ विवाह केला जातो. विवाहानंतर एका वर्षातच संबंधित अल्पवयीन मुलीवर बाळंतपण लादले जाते. यामुळे माता व बाल मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ताज्या बातम्या

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना हे देणार बांगड्यांचा आहेर ?

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये, बनावट सोनेतारणचे 6 कोटी रुपये तसेच शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये...

नगर जिल्ह्यात या ठिकाणी गावरान कांद्याला विक्रमी भाव…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले.गावरान कांद्याची सुमारे 17 हजार 715 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला 3000 ते 3300 रुपयांचा...
error: Content is protected !!