Tuesday, November 30, 2021

कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि कर्मचारी शिष्टमंडळात आज घेण्यात आलेली बैठक सकारात्मक झाल्याचे

दिसून आले. यामध्ये सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यावर सहमती झाल्याची माहिती समजते. त्यामुळे एसटी कर्मचार्ऱ्यांसाेबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार हा एसटीचा हा संप लवकरच मिटेल अशी आशा निर्माण झाली.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केलाय. शिवाय अनेक कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावरही ठाण मांडून बसलेत.

या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे करत आहेत.
दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही मैदानात उतरले आहेत.

एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत

मनसे नेते बाळा नांदगावकर आणि एसटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारीही उपस्थित होते.या घडामोडीनंतर कामावर परत या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा देत राज्यातील अनेक संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले.

हा संप आणखी चिघळू नये यासाठी सरकारकडून त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!