Friday, December 3, 2021

आरोग्य मंत्र्यांसह नगर जिल्हा शल्यचिकित्सकांवर गुन्हा दाखल करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नगर येथे जिल्हा रुग्णालयात व विभागाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनास भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

त्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर यांनी विविध प्रश्‍नांवर भूमिका स्पष्ट केली.नगर जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागाच्या अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता.

घटना स्थळाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी भेटी दिल्या. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही घटना स्थळाला भेट दिली. या वेळी त्यांनी राज्य सरकार वर टीका केली.प्रवीण दरेकर म्हणाले, भंडारा जिल्ह्यात रुग्णालयास लागलेल्या आगीनंतर राज्य शासनाने राज्यातील

सर्व शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करणे गरजेचे होते. फायर ऑडिट यांनी राज्यातील 337 रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी अंदाजपत्रक दिले आहे. अद्याप एकाही रुग्णालयाचे काम सुरू नाही. या दुर्लक्षामुळेच

नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेला आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

दरेकर पुढे म्हणाले की, नगरच्या जळीतकांडास राज्य सरकार जबाबदार आहे. घटनेनंतर लोकांचा असंतोष कमी करण्यासाठी कोणाला तरी बळीचा बकरा बनवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बोलाची कढी अन्‌ बोलाचा भात अशी सरकार आणि मुख्यमंत्री यांची भाषा आहे.

दुसरीकडे भंडाऱ्याच्या अगीच्या घटनेनंतर आरोग्य मंत्र्यांनी केवळ घोषणाच केल्या. प्रत्यक्षात काहीच केले नाही.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!