Saturday, November 27, 2021

नगरमध्ये शिवसेनेच्या या मंत्र्यांना शिवसैनिकांनी रोखले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये होत असलेल्या कार्यक्रमावर कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला. एवढेच नव्हे तर कार्यक्रमाला जात असणारे शिवसेनेचे राज्यमंत्री

अब्दुल सत्तार यांना तालुक्यातील मिरजगाव येथे शिवसैनिकांनी रोखून धरले. तसेच महाविकास आघाडीचे घटक असणारे राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप केला.कर्जत येथे शनिवारी सकाळी

तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्यांची तालुका प्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत शहरांमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मिरजगाव

येथे क्रांती चौकात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडीला घेराव घालून कार्यक्रमास उपस्थित न राहण्याची मागणी करण्यात आली.कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. रोहित पवार हे महाविकास आघाडीचे आमदार म्हणून गेले दोन वर्षे मिरवत आहेत.

पण महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांना आणि कार्यकर्त्यांना वेळोवेळी डावलून अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. तसेच कुठल्याही कार्यक्रमात अथवा विकास कामांच्या बाबतीत विश्वासात

घेतले जात नाही, असेच जर पुढील काळात होत असेल तर कर्जत तालुका शिवसेना भविष्यात आपली ताकद दाखवून देईल, असे कर्जत शिवसेना तालुका प्रमुख यादव यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!