Saturday, November 27, 2021

राधाकृष्ण विखे यांना अजित पवार यांच्या कडून अप्रत्यक्ष लक्ष म्हणाले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सतत काहीतरी कुरापती काढून दंगल हिंसा भडकवत आहेत. मात्र जनतेने अशा दिशाभूल करणार्‍या समाजकंटापासुन सावध राहावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

जामखेड येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, केंद्र शासन राज्याला मदत करण्याऐवजी कुरघोडीचे राजकारण करत आहे. शिखर बँकेच्या सहकार्याने शेतकर्‍यांना लवकरच

शुन्य टक्के व्याजाने पाच लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. विज ही कोणाची मक्तेदारी नाही. 70 हजार कोटींची बिले थकली आहेत. सर्वांनी बीले भरली पाहिजेत एकटे सरकार काही करू शकत नाही. कर्जत जामखेडची जनता सुज्ञ आहे कोण विकास करणार हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे

त्यामुळे पोकळ गप्पा मारणार्‍यांना घरी बसवले आहे. पुर्वी येथे मंत्री असुनही कामाचा दर्जा निकृष्ट होता. एसटी संपाविषयी आरक्षण विषयी बोलताना सांगितले की कोणी आत्महत्या करू नये सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.

कर्ज वाटपात जिल्हा बँकेकडून कर्जत-जामखेड तालुक्यांबाबत दुजाभाव केला जात असून याकडे आपल्याला पाहावे लागेल. असे बोलत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना लक्ष केले. उदय शेळके तसेच इतर ज्येष्ठ संचालकांना याबाबत आपण विचारणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आमदार कसा असावा हे कर्जत जामखेडकडे पाहुन सांगता येते. रोहित पवार विकासकामाने झपाटलेला आहे. त्यांनी संपुर्ण कामाचा आराखडा तयार केला आहे.

महाविकास आघाडी सरकार च्या काळात विकासासाठी निधी कमी पडणार नाही.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!