Wednesday, December 8, 2021

राम शिंदे, बबनराव पाचपुते यांचा अजित पवारांनी घेतला समाचार, म्हणाले…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटूंबीयांवरही गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या कामांवरही टीका करण्यात आली. अजित पवार यांनी आज भाजप नेत्यांचा समाचार घेत जोरदार टीका केली.

जामखेड येथे विविध विकासा कामांचे भूमिपूजन अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार नीलेश लंके,

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख आदी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड-श्रीगोंदे असा एक विधानसभा मतदार संघ होता. नंतर श्रीगोंदे मतदार संघ वेगळा झाला. आतापर्यंत या मतदारसंघातील आमदारांनी काय केले यावर मी बोलणार नाही.

हा दुष्काळी भाग आहे. येथे पाणी आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला. तुम्ही लोकांनी आमच्या रोहितला मतांचे दान देऊन निवडून आणले आहे. त्याच्यावर विश्वास दाखविला आहे. कोरोनाचा काळ असूनही मागील दोन वर्षांत रोहित पवार यांनी मोठा निधी आणला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, काही लोकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना बनविण्याचा प्रयत्न केला. जामखेडमधील पाणी पुरवठा योजना आम्हीच आणली अशी वल्गना केली. पण प्रत्यक्षात आम्ही पाठपुरावा करून ही पाणी पुरवठा योजना केली. विधानसभा निवडणुकांच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी

कागद दाखवून पाणी पुरवठा योजनेला तत्वतः मंजुरी दिल्याचे सांगितले. लोकांची दिशाभूल केली. महाविकास आघाडी अशी दिशाभूल करत नाही. मीही अनेक वर्षांपासून मंत्री आहे. तत्त्वतः मंजुरी म्हणजे काय? एक तर मंजूर केले म्हणा किंवा मंजूर करू म्हणा, अशी एकाच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी

मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी टीका केली.अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने दिला नाही एवढा 2800 रुपये प्रतीटन एफआरपी भाव अंबालिका साखर कारखाना देत आहे. करायचे असेल तर समाजाच्या भल्यासाठी काम करा. काही साखर कारखान्यांनी

तर मागील दोन हंगामांचे एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, असा टोलाही अजित पवारांनी नाव न घेतात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना लगावला.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!