Friday, December 3, 2021

नगरमध्ये विरोधीपक्षनेते प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी नगरमध्ये होते. नगरच्या पोलिसांनी दबावाखाली फक्त आरोग्य कर्मचार्‍यांवर कारवाई केली का, असा प्रश्न निर्माण होत असून राज्यातील फायर ऑडिटनुसार 337 रुग्णालयांचे

अंदाजपत्रक पाठवले असताना अद्याप एकाही रुग्णालयाचे काम सुरू नाही, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते शनिवारी नगर दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी आधी जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडव झालेल्या भागाची पाहणी केली.

त्यानंतर परिचारिकांच्या संपात सहभागी होत त्यांना पाठींबा दिला. परिचारिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तारकपूर आगारात जावून एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला भेट दिल्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधला.

दरेकर म्हणाले, नगर जिल्हा रूग्णालयातील अग्नीतांडवास राज्य सरकार जबाबदार आहे. घटनेनंतर लोकांचा असंतोष कमी करण्याासाठी कोणाला तरी बळीचा बकरा बनवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बोलाची कढी अन् बोलाचा भात अशी सरकार आणि मुख्यमंत्री

यांची भाषा आहे. दुसरीकडे भंडार्‍याच्या अगीच्या घटनेनंतर आरोग्य मंत्र्यांनी केवळ घोषणाच केल्या. प्रत्यक्षात काहीच केले नाही. बेफीकीर सरकार आणि बेफीकीर प्रशासन यामुळे नगरची घटना घडली आहे. यामुळे नगरसह राज्यातील रुग्णालयात आगीच्या

घटनांमध्ये शेकडो बळी गेलेले आहेत. नगरच्या गुन्ह्यात पोलीसांनी कशाच्या आधारे गुन्हे दाखल केले याबाबत त्यांना विचारणा करणार आहे. या गुन्ह्यात वरिष्ठ अधिकारी आणि अन्य कर्मचार्‍यांना का घेतले नाही, याचा शोध घेणार आहे. राज्यात रुग्णालयात

फायर ऑडीटनंतर करावयाच्या उपाययोजनाबाबत खिडकी योजना असावी, तरच लवकरात लवकर कामे होतील असेही दरेकर म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!