Friday, December 3, 2021

नगरमध्ये अजित पवारचा भाजपवर चिडले; केला ‘हा’ गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,

राज्यमंत्री अब्दुल सत्तार, दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्थापना होऊन साठ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र या महामंडळाचे

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मुद्दा कधीच उपस्थित झाला नाही. आता कर्मचाऱ्यांना भडकावण्यासाठी भाजपकडून तो पुढे केला गेला आहे. इकडे एसटीसाठी हा मुद्दा लावून धरणाऱ्या राज्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्र सरकारने ‘ एअर इंडिया ‘चे खासगीकरण

केलेले कसे चालते,’ असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ एसटी कामगारांचे आंदोलन भाजपच्या वतीने जाणीवपूर्वक चिघळवले जात आहे. एसटीचे सर्व कर्मचारी आमचेच आहेत. त्यांच्या मागण्या आम्हालाही पटतात.

सरकार याबाबत सकारात्मक आहे. असे असूनही विरोधी पक्षातील काही आमदार आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलकांना भडकवत आहेत. साठ वर्षांत कधीही एसटी विलीनीकरणाचा प्रश्न उपस्थित केला गेला नाही. मग आत्ताच कशामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात

आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. विरोधकांच्या राजकारणामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये. केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण केले. केंद्रातील सरकार भाजपचे आहे. मग त्याच्या विरोधात राज्यातील भाजप नेते व सदर

आमदार गप्प का आहेत? केंद्र सरकारने खासगीकरण केले तर चालते, मात्र आम्ही एसटीचे खासगीकरण करणार नसतानाही जाणीवपूर्वक एसटी कामगारांना भडकावून आंदोलन पेटविण्याचे काम ही मंडळी करीत आहेत,’ अशी टीका पवार यांनी केली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!