Friday, December 3, 2021

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशाचे सहकार मंत्री अमित शहा हे वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.
रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अमरावतीमध्ये होते.याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पाटील यांनी आपल्या तिरकस शब्दांत बोचरी टीका केली.

ते म्हणाले, आम्ही खूप व्यापक मनाचे आहोत. त्यामुळेच सहकार मंत्री अमित शहा हे वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. सत्तेत असताना मी ही बराच वेळा

या संस्थेला भेट दिली आहे. आता अमित शहा हे सहकार मंत्री आहे. त्यामुळे ते वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही. वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूट काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. शरद पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक

शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली चांगली संस्था आहे. या दौऱ्यात शहा पवारांना भेटले तर काहीही चुकीचे नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सहकार मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच

महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेस भेट देणार आहेत. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इस्न्टिट्यूटच्या भेटीचा या दौऱ्यात समावेश आहे.पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी केंद्रात सहकार खाते स्थापन झाले. त्यानंतर पहिले सहकार मंत्री म्हणून शहा यांच्याकडे जबाबदारी आली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सहकार चळवळीचा जोर आहे.

स्वतः शहा यांनी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे. आता ते महाराष्ट्रातील दौऱ्यात सहकार क्षेत्राची माहिती घेणार आहेत. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आज हे वक्तव्य केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!