Saturday, November 27, 2021

भारतात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ;या राज्याने वाढवली चिंता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात भारतात ११ हजार २७१ नवे रुग्ण आढळले असून २८५ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिलासा देणारी बाब म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ९१८ इतकी आहे. देशातील नव्या रुग्णसंख्येत एकट्या केरळमधील ६ हजार ४६८ रुग्ण आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४४ लाख ३७ हजार ३०७ इथकी झाली आहे.

तर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून १ लाख ३५ हजार ९१८ इतकी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ६३ हजार ५३० झाली आहे. आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ३७ हजार ५८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनावर देशव्यापी लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत ११२ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ५७ लाख ४३ हजार ८४० जणांना शनिवारी लस देण्यात आली आहे. एकूण ११२ कोटी १ लाख ३ हजार २२५ डोस देण्यात आले आहेत.

देशात केरळने चिंता वाढवली आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात ६ हजार ४६८ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५० लाख ५५ हजार २२४ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

असून मृतांची संख्या ३५ हजार ६८५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ६८ हजार ६३० जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!