Friday, December 3, 2021

अन्याय होणाऱ्या व्यक्तिने न्याय हा माघितलाचं पाहिजे-न्यायाधीश तापकिरे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

अन्याय होणाऱ्या व्यक्तिने न्याय हा माघितलाचं पाहिजे असे प्रतिपादन नेवासा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम.तापकिरे यांनी केले.

तालुक्यातील पानेगाव येथील महादेव देवस्थान सभागृहात ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने तसेच सुप्रीम कोर्ट, भारत सरकारच्या विद्यमाने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पासून सुरु झालेल्या तसेच 14 नोव्हेंबर स्व. पंडित नेहरू जयंती बालदिन या 44 व्या मॅरेथॉन कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

न्या.तापकीरे पुढे म्हणाले, न्याय मिळविण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीयांना घटनेनं दिलेला अधिकार असून कुणावर हि अन्याय होणार नाही. काही लोक आर्थिक दृष्ट्या मागासलेली असतात, उत्पान्नाचे साधनं नाही.काही आरोपी, अपंग, ज्यांच्या गरीब परिस्थितीमुळे बाजू मांडण्यासाठी त्यांना जिल्हा, तालुका विधी सेवा प्राधिकरणकडे संपर्क करुन याबाबत त्यांची परिस्थिती बघून विनामूल्य न्यायालयीन काम करण्याची तरतूद असल्याचे सांगून गाव, शेजारील गांव,तालुका, जिल्हा समृद्ध व तंटामुक्त करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी कायदा हातात न घेता त्याचा वापर करा. कायदा हा सर्व श्रेष्ठ असल्याचे सांगून कायद्याचे ज्ञान असले पाहिजे.अन्याय करणारा जेवढा जबाबदार तेवढाच सहन करणारा जबाबदार आहे.अन्याय सहन केला तर समोरच्या व्यक्तीचे मनोबल वाढत जाते, त्यासाठी वेळीच अशा व्यक्तींना कायद्याने धडा शिकवला पाहिजे. पोलीस प्रशासन आपल्याला निश्चितच न्याय देईल. बालविवाह बरोबरच शाळेतील मुला-मुलींना होणारा त्रास याबाबत दक्ष राहून तातडीने पोलीस ठाण्याची संपर्क केला पाहिजे जेणे करून भविष्यात होणार नाही.

जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक सुनील लांबदांडे यांनी बालमजुरी, श्रीकांत शिंदे यांनी बालदिनाच्या निमित्ताने माहिती सांगितली.ऍड.अण्णासाहेब अंबाडे यांनी विधी सेवा समितीचे कार्यपद्धती विशद करून कायद्याने न्याय कसा मिळविणार लोकन्यायालय,चावडी कमिटी,पंच कमिटी तंटामुक्ती समिती न्याय प्रविष्ट प्रकरण,मनाई हुकूम,चेक, प्रलंबित दावे या बाबत माहिती दिली.
उपस्थितीत मान्यवरांना जेष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांचे अर्ध विराम पुस्तक व वृक्ष भेट देण्यात आले.

कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार , गोपनीय विभागाचे श्री. वाघमोडे,विधीज्ञ बी.एस. टेमक, बी.आर. गव्हाणे,अड.गरड, अड.शिरसाठ, किशोर सांगळे, दिपक गायकवाड, खिळदकर, लक्ष्मण घावटे ,भारत वर्मा, बाळासाहेब भुसारी रामदास कुरकुटे, किशोर ढेरे ,संभाजी पवार, सरपंच संजय जंगले, उपसरपंच रामभाऊ जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप,हभप गुडधे, मच्छिंद्र जंगले, ज्ञानेश्वर जंगले,बाळासाहेब घोलप, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, भाऊसाहेब काकडे, सतिश जंगले,किशोर जंगले, गणेश जंगले, रमेश गुडधे सुनील चिंधे, बाबासाहेब शेंडगे, योगेश घोलप आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
अड. कारभारी वाखूरे यांनी प्रास्ताविक केले.सुत्रसंचालन संदिप जंगले यांनी सूत्रसंचालन केले.ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंड यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल
न्या.तापकीरे यांनी सरपंच संजय जंगले व ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांचे कौतुक केले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!