Tuesday, November 30, 2021

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने आज अंमलबजावणी संचालनालय (ED) व सीबीआयच्या (CBI) प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन्ही तपास यंत्रणांच्या संचालकांची नियुक्ती दोन वर्षांच्या ठराविक

कालावधीसाठी केली जात होती. सध्या देशात सीबीआयचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत.नवीन अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (1+1+1) मुदतवाढ

दिली जाईल. प्रत्येकी एक वर्षासाठी तीन मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र, ते एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त असू नाही शकत.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 2018 मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात बदल करून केंद्र सरकारने ईडीचे संचालक

संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला होता परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.1997 पूर्वी सीबीआय संचालकांचा कार्यकाळ निश्चित नव्हता आणि सरकार

त्यांची कधीही बदली करू शकत होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विनीत नारायण यांच्या निकालात सीबीआय संचालकांना स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी देण्यासाठी किमान दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला होता.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!