Saturday, November 27, 2021

येत्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस;याठिकाणी हाय अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओसरल्यानंतर, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील काही दिवसांत

याचं चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाचही दिवस अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज पुण्यासह एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3-4 तासांत

संबंधित जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे.

दुसरीकडे, दक्षिण अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता 15 नोव्हेंबरनंतर वाढणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची व्याप्ती आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाढणार आहे. याचा परिणाम

म्हणून उत्तरेकडील थंड हवेचा जोर कमी झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!