Wednesday, December 8, 2021

स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, येत्या 1 डिसेंबर पासून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय स्टेट बँकेने घोषणा केली आहे की, आता कार्डधारकांना EMI ट्रांजेक्शनसाठी 99 रुपये प्रोसेसिंग फी आणि त्यावर टॅक्स द्यावा लागणार आहे. हा नवा नियम येत्या 1 डिसेंबर 2021 पासून लागू केला जाणार आहे. बँकेने आपल्या

सर्व ग्राहकांना याबद्दल ईमेल करुन सांगितले आहे. ही प्रोसेसिंग फी, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून EMI च्या खरेदीवर वसूल करण्यात येणाऱ्या व्याजाप्रमाणे घेतली जाणार आहे. ईएमआय ट्रांजेक्शन रद्द झाल्यास प्रोसेसिंग फी परत केली जाणार आहे.

बहुतांश बँका दीर्घकाळापासूनच ईएमआयच्या देवाणघेवाणीसाठी प्रोसेसिंग फी घेतात.SBICPSL यांनी स्पष्ट केले आहे की, 1 डिसेंबर पूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही ट्रांजेक्शनवर प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही आहे. कंपनी रिटेल

आउटलेटच्या खरेदीवर चार्ज स्लिच्या माध्यमातून कार्डधारकांना ईएमआयच्या ट्रांजेक्शनवर प्रोसेसिंग चार्ज बद्दल सांगणार आहे. समजा तुम्ही ईएमआय योजनेअंतर्गत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मोबाईल फोन खरेदी केला आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून पैसे भरल्यास,

कार्ड कंपनी तुमच्याकडून प्रक्रिया शुल्क आणि कर म्हणून रु. 99 आकारेल. हे शुल्क तुमच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये EMI रकमेसह दिसेल.दरम्यान, भारतीय स्टेट बँकेच्या पेन्शनधारकांना 1 नोव्हेंबर पासून Video Life Certificate Service च्या माध्यमातून

व्हिडिओ कॉलिंगच्या सहाय्याने आपले जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे. याचा लाभ एसबीआयच्या खातेधारकांना घेता येणार आहे. व्यक्तीकडे आपला मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत रजिस्टर्ड असावा. पेन्शन अर्जात सुद्धा हा क्रमांक असावा. ही सुविधा पेन्शनधारकांना खासकरुन उपलब्ध करुन दिली आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!