Friday, December 3, 2021

पंकजा मुंडे म्हणतात ही जनता हुशार; कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:परळीसह बीड जिल्ह्यात घडणाऱ्या घटनेवरून पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेंवर चांगलाच निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या, की परळीची जनता ही फार हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचे व कोणाची पतंग कधी काटायची ? हे याना चांगलेच

माहीत आहे. मला विरोधकांवर टिका करायची नाही. कारण त्यासाठी मला माझी पातळी खाली करावी लागेलं आणि मी माझी पातळी खाली करनार नाही. असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. त्या परळी येथे आयोजित

दीपावली निमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रमात बोलत होत्या.पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, समुद्र मंथनाच्या वेळी विष पेण्याचे काम या महादेवांनी केले आणि परळी ही महादेवाची नगरी आहे. अनेक लढाया बाकी आहेत, आणि या लढाया मी लढणार आहे.

दहा पाच लोक आहेत ज्यांना बील मिळालेत, मात्र शेतकरी, मजूर, सामान्य जनता यांना अद्याप काहीच मिळाले नाही, त्यामुळं ते वेळ आल्यास आपल्या मताची ताकद दाखविणार आहेत.परळीची जनता ही फार हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचे व कोणाची

पतंग कधी काटायची? हे यांना चांगलेच माहीत आहे. मी काही मतासाठी काम करत नाही, तर आपल्या लोकांसाठी मी काम करत आहे. माझा नारा स्वच्छ आहे, माझा कार्यकर्ता स्वच्छ आहे आणि माझा फाटकाच कार्यकर्ता नगर पालिकेच्या निवडणुकीत

आपल्यासाठी येणार आहे. आपल्याला जे काम करायचं आहे ते सकारात्मक करायचे आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी परळी नगर पालिका निवडणुकीत आम्ही सज्ज असल्याचा इशारा देखील विरोधकांना दिला आहे..

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!