Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यातील विचित्र घटना :तू माझ्या गाडीवर का येत नाही असे म्हणत शिक्षकाने परिचारीकेस मिठी मारली अन् पुढे…..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

.

माय महाराष्ट्र न्यूज :तु दुसऱ्याच्या गाडीवर दवाखाण्यात का येते? मी तुला घरी नेवून सोडतो ना.! असे म्हणत एका शिक्षकाने परिचारीकेस  मिठी मारत तिचा विनयभंग केला. त्याच्यापासून सुटका करण्यासाठी या तरुणीने स्वत:ला हॉस्पिटलच्या

एका खोलीत कोंडून घेतले आणि पोलिसांना बोलावून घेत दोघांनाही बेड्या ठोकण्यास सांगितल्या. मोठ्या धैर्याने पुढे येत अन्याय सहन न करता कायद्याचा आधार घेत तिने शिक्षक व त्याच्या मित्रावर गुन्हा ठोकला आहे. ही घटना शनिवार दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी

दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादिनुसार राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक संतोष भाऊराव धिंदळे (रा. केळुंगण, ता. अकोले) व अनिल भरत पोपेरे (रा. कोंभाळणे, ता. अकोले, जि. अ.नगर)

या दोघांना आरोपी करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित परिचारीका ह्या केळुंगण परिसरातून राजूर येथील एका डॉक्टरांकडे कामासाठी येत असतात. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नसल्यामुळे, मिळेल त्या वाहनाने प्रवास करुन त्या रोज राजुरला येत असतात.

मात्र, या दरम्यान आरोपी संतोष धिंदळे यांची अपेक्षा असते की, काही झाले तरी हिने कोणाच्या गाडीवर येऊ नये, माझ्याच गाडीत बसून सोबत यावे. आता हा प्रकार कशासाठी ? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, पीडित तरुणीला त्यांच्यासोबत येणे योग्य वाटत नसेल,

म्हणून तर तिने त्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आता, दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे, शिक्षक महाशयांनी आपल्या मित्राला सोबत घेतले आणि शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास थेट हॉस्पिटल गाठले.

त्या दिवशी हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांनी पीडित परिचारीकेस सांगितले की, पेशन्टवर लक्ष ठेव, काही अर्जन्ट आल्यास फोन कर. त्यामुळे ती आपले काम चोख बजावत होती.दरम्यानच्या काळात धिंदळे व त्याचा मित्र पोपेरे हे एक ओमनी कार घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले.

पोपेर हा पुढे गेला असता परिचारीकेस म्हणाला की, बाहेर गाडी आली आहे. तुम्ही पटकन चला. तेव्हा या तरुणीस वाटले की, कोणी पेशन्ट आले आहे. त्यामुळे, त्या घाईघाई बाहेर येऊन गाडीकडे निघाल्या. गाडीत पेशन्ट असावे, त्यांना उतरता येत नसेल, सिरियस रुग्ण असावा म्हणून त्या शिताफीने पुढे

झाल्या तर त्यास भलताच रुग्ण बसलेला होता. तेव्हा तिने गाडीत बसलेल्या धिंदळे शिक्षकास विचारले की काय झाले आहे. तेव्हा त्याने काही एक न एकता तिचा हात धरुन जवळ ओढले आणि मिठी मारली असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर, परिचारीका फार घाबरल्याने तिने

त्यास जोराचा धक्का दिला आणि त्यास बाजुला लोटू देत तेथून पाळ काढला. हॉस्पिटलकडे येत असताना धिंदळे तिला आवाज देत होता. परंतु, तिने काही एक न एकता स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धिंदळे हा तिच्यामागे पळत येऊन त्याने तिचे केस घट्ट पकडून ओढत शिविगाळ

करत म्हणाला की, तु दुसऱ्याच्या गाडीवर का ये जा करते, मी तुला घरी नेवून सोडतो असे म्हणत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला.तेव्हा मोठा प्रसंगावधान राखत तिने हॉस्पिटलच्या एका खोलीत जाऊन स्वत:ल कोंडून घेतले. तेव्हा दरवाजावर थापा मारुन धिंदळे हा जोरजोरात दार उघड असे म्हणत होता.

त्यामुळे, त्याच्यापासून वाचण्यासाठी पीडित तरुणीने तिच्या एका नातेवाईकास फोन करुन घडला प्रकार सांगितला आणि पोलिसांना घेऊन हॉस्पिटलला येण्यास सांगितले. त्यानुसार राजूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांची टिम तेथे काही

क्षणात हजर झाली आणि या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काल याप्रकरणी पाडित तरुणीने फिर्याद दिली असून यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!