Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकींग: विहिरीत 22 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील वाकडी येथील श्री खडेराय देवस्थानच्या नजीकच असणार्‍या जाधव वस्ती येथील गट नंबर 510 मधील विठ्ठलराव आबाजी जाधव यांच्या विहिरीत 22 वर्षीय

विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर मृतदेह हा येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकाच्या सुन सुजाता उर्फ डल्ली प्रकाश सुनार (नेपाळ) असे नाव असल्याचे समजते आहे.

प्रकाश सुनार (मुसीकोट नगरपालिका, ता. जि. रुकुम नेपाळ) हा येथीलच हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतो. येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षक म्हणून प्रकाशचे वडील काम बघतात. प्रकाशची पत्नी व वडील हे वाकडी येथील देवस्थानच्या रूममध्ये राहतात.

येथील रहिवाशी विठ्ठलराव जाधव यांच्या वस्तीलगतच स्वमालकीची विहीर आहे. दि. 14 नोव्हेंबर रात्री 2 च्या सुमारास अचानक आरडाओरड सुरु झाली. आजुबाजुचे स्थानिक नागरिक जमा झाले. तेव्हा विहिरीच्या कडेला चप्पल आढळून आली.

सकाळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. गोरे, श्री. बढे, कॉ. संतोष कराळे, अशोक पवार हे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक राजेंद्र शेळके, प्रमोद शेळके, दिंगबर आढाव, बाबासाहेब आहेर,

विजय जाधव, नितीन जाधव, अविनाश जाधव यांच्या व स्थानिक युवकांच्या मदतीने सुमारे 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर गळाच्या साह्याने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात यश आले.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!