Saturday, November 27, 2021

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिवशाहिर बाबासाहेब अर्थात बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे यांचे आज निधन झाले आहे. ते 100 वर्षांचे होते. आज सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.बाबासाहेबांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेबांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर वृद्धापकाळानं त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

त्यांचं जाणं साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला चटका लावून गेलं आहे.बाबासाहेबांनी हयातभर शिवचरित्राचा ध्यास घेतला होता. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले.

या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. बाबासाहेबांनी राज्यासह देशातील अनेक किल्ल्यांवर भटकंती केली होती. काही झालं तरी शिवाजी राजांचे विचार सर्व सामान्यांपर्यत जायला हवेत या भावनेनं त्यांनी साहित्याच्या

आधारातून जनजागृती केली. त्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित भव्य अशा राजा शिवछत्रपती नाटकाची निर्मितीही केली होती. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद दिला होता.बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव सकाळी 8.30 वाजता त्यांच्या पर्वती

येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या सकाळी 10.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!