Wednesday, December 8, 2021

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी :पुढील 7 दिवस ही सुविधा बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोबाइल अॅप अथवा संकेतस्थळावरून रेल्वे प्रवासासाठी तिकिट आरक्षित करताय? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी पुढील ७ दिवस रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम दररोज सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे आता आपल्या टिकिट सिस्टिम आणि ट्रेन क्रमांक अपग्रेड करण्यासाठी तांत्रिक बदल करणार आहे. त्यासाठी तिकिट आरक्षण यंत्रणा रात्री 23.30 वाजल्यापासून ते सकाळी 5.30 वाजेपर्यंत बंद असणार आहे. ही तांत्रिक प्रक्रिया

आज रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. ही तांत्रिक बदल प्रक्रिया 20-21 नोव्हेंबर रात्रीपर्यंत सुरू असणार आहे. या कालावधीत तिकिट आरक्षण, टिकिट रद्द करणे, रेल्वेबाबतची चौकशी आदी सेवाही बंद असणार आहे.रेल्वेचे तिकिट दर आणि रेल्वे क्रमांक अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे पुढील सात दिवस PRS यंत्रणा बंद असणार आहे. प्रवासी सेवा सामान्य करण्याच्या आणि टप्प्याटप्प्याने कोरोना स्तरावर परत येण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) पुढील 7 दिवसांसाठी

रात्रीच्या वेळी 6 तासांसाठी बंद केली जाईल. सिस्टीम डेटाचेअपग्रेडेशन आणि नवीन ट्रेन नंबरचे अपडेटसाठी सक्षम करण्यासाठी हे काम केले जाणार आहे. सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात मागील काळातील जुन्या ट्रेन क्रमांक आणि वर्तमान

प्रवासी बुकिंग डेटा अद्ययावत केला जाणार आहे. तिकीट सेवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काळजीपूर्वक कॅलिब्रेट केलेल्या टप्प्यात आणि रात्रीच्या वेळी अंमलात आणल्या जातील. कोरोना महासाथीचा संसर्ग दर कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने

विशेष ट्रेनचे संचालन बंद करण्याचा आणि नियमित ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकिट दरात दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात प्रवाशांना 30 टक्के अधिक तिकिट दर मोजावा लागत होता.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!