Tuesday, November 30, 2021

सुरत-हैदराबाद महामार्गासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी या तारखेला हरकती दाखल करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सुरत-हैदराबाद महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यावर काही हरकती असल्यास २१ नोव्हेंबरपर्यंत श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी किंवा राहुरी येथील

तहसीलदारांकडे दाखल कराव्यात, असे आवाहन नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.धामोरी बुद्रुक येथे सुरत-हैदराबाद महामार्गासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात तनपुरे बोलत होते. श्रीरामपूरचे

उपविभागीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसियोद्दीन शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके उपस्थित होते.तनपुरे म्हणाले, ‘‘सुरत-हैदराबाद महामार्गासाठी जमिनी गेलेल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी

सोडविण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. या प्रश्‍नाबाबत नजीकच्या काळात केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांची वेळ घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’

दरम्यान, राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ व मुळा धरण प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. दोन्ही प्रकल्पांतील बाधित व विस्थापित शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. आता सुरत-हैदराबाद महामार्गासाठी तिसऱ्यांदा जमिनीचे अधिग्रहण होत आहे.

या महामार्गात बागायती शेतजमिनीसह पक्की बांधकामे, विहिरी, कूपनलिका जाणार असल्याने प्रकल्पबाधितांच्या भावना तीव्र आहेत.

राहुरी तालुक्यातील धानोरे, सोनगाव, माळेवाडी-डुक्रेवाडी, कानडगाव, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर, कणगर खुर्द, कणगर बुद्रुक, चिंचविहिरे, मल्हारवाडी, मोमीन आखाडा, राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, डिग्रस, सडे, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, वांबोरी या १९ गावांमधून महामार्ग जाणार असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक जमिनीचे अधिग्रहण राहुरी तालुक्यातून होणार आहे‌.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!