Wednesday, December 8, 2021

मंत्री तनपुरे म्हणाले नगर जिल्ह्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याच्या बातम्या ऐकल्या परंतु ते….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राहुरी- नगर- पाथर्डी मतदार संघात गेल्या १० वर्षपासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत होता. तालुक्यातील रस्त्याच्या प्रश्नात लक्ष घालून मला मिळत असलेल्या निधीतील ७० ते ८० टक्के निधी हा रस्त्याच्या कामासाठी वापरत असून जनतेच्या

दृष्टीने महत्वाचा असलेला दळण वळणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे विकास कामाना निधी मिळण्यासाठी अडचण येत असली तरी मिळणारा निधी हा विकास कामांसाठी वापर करुन येत्या उर्वरित कालावधीत कामे

मार्गी लावण्यात येतील असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.राज्यमंत्री तनपुरे हे तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच पत्रकारांचा सन्मान व गावातील

विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुरेश झुगे हे होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, पंचायत समितीचे गट नेते रवींद्र आढाव, डॉ तनपुरे

कारखान्याचे संचालक भारत तारडे, बाजार समितीचे संचालक सुभाष डुक्रे, युवा नेते अनिल इंगळे, दिलीप इंगळे, रामदास वने आदि प्रमुख उपस्थित होते.

त्या बातम्या बिनबुडाच्या…..
गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याच्या बातम्या ऐकल्या परंतु या सर्व बातम्या बिनबुडाच्या आहेत. इकडून-तिकडे उड्या मारणा-यांना पक्ष स्थान देत नाही तर राष्ट्रवादी पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी मिळते

त्यामुळे त्यांनी केविलवाणा प्रयत्न करूच नये. आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष योग्य व्यक्तीलाच उमेदवारी देईल अस स्पष्ट करत ना.प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिलेंच्या पक्ष प्रवेशाची चर्चा पुर्णपणे फेटाळली आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!