Friday, December 3, 2021

पैसे दे अन्यथा अश्लील व्हिडिओ व्हायरल करु; धमक्यांना घाबरुन प्रेमी युगुलाची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: दोघांच्या प्रेम संबंधाचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. तू आम्हाला पैसे दे नाही तर आम्ही तुमची बदनामी करू, अशी धमकी दिल्याने प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यतल्या

गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथे घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२८ वर्षीय उमेश साळुंके आणि १८ वर्षीय तबसुम शेख अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मयत उमेशच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गावातील कृष्णा रावसाहेब पवार यांनी तुमचे अश्लिल व्हिडिओ आमच्याकडे आहेत, तू आम्हाला पैसे दे नाही तर तुझे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू असे म्हणून मृत उमेश याला दमदाटी करुन धमकी देत होते. हा प्रकार माझ्या मुलाने माझ्या कानावर टाकल्यावर

मी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, भाऊ मच्छिंद्र साळुंके यांना घेऊन धमकी देणाऱ्याच्या घरी जाऊन उमेशला त्रास देऊ नको आणि उमेशची विनाकारण बदनामी करु नका असे सांगितले होते. तरीही तो ऐकत नसल्याने

माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचे तक्रारीत लिहिले आहे.कृष्णा रावसाहेब पवारच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळूनच माझा मुलगा उमेश याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी साळुंके यांनी केली.

याप्रकरणी मालुंजा येथील एका जणाविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृताचे वडील संतराम साळुंके यांच्या फिर्यादीवरून कृष्णा रावसाहेब पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!