Friday, December 3, 2021

उद्या नगर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा अंदाज ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रतीक्षेनंतर काही दिवसच अवतरलेली थंडी गायब झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या

काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात गेल्या आठवडय़ात कोरडय़ा हवामानाची स्थिती होती. त्याचबरोबर उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाही सुरू झाले होते. त्यामुळे राज्यात

सर्वच ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी झाले होते. परिणामी काही भागांत रात्री गारवा निर्माण झाला होता. दिवसाचे कमाल तापमानही सरासरीच्या खाली आल्याने उन्हाचा चटकाही कमी होता. थंडी सुरू झाली असे वाटत

असतानाच दक्षिणेकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले. तिथे जोरदार पाऊस झाला. पाठोपाठ अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा परिणाम राज्यावर झाला असून, पावसाळी वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात एकदमच वाढ झाली आहे.

सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी खाली आलेले किमान तापमान सध्या सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांनी वाढले आहे.कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात १६ नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाडय़ातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!