Friday, December 3, 2021

सोयाबीनच्या दरात होते सुधारणा शेतकऱ्यांना हा मोलाचा सल्ला..?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हंगामाच्या सुरवातीपासून सोयबीनच्या दरात घट होती. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक असून शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यात या पिकाचा मोठा वाटा समजला जातो. पण घटत्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली होती.

दिवाळीनंतर बाजारपेठेत बदल दिसत असून दरात वाढ होत आहे.अखेर दोन महिन्यानंतर का होईना सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होऊ लागली आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या बाजारात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ ही प्रति क्विंटलमागे होत आहे.

मागणी वाढत असल्यामुळे हा बदल होत आहे. मात्र जर वाढत्या दराबरोबर आवक वाढली तर याचे विपरीत परिणाम बाजारावर होणार आहेत. त्यामुळे आता चित्र तर बदलले आहे. पण याचा लाभ कसा घ्यावयाचा याबाबत कृषी अधिकारी व्यापारी

हे शेतकऱ्यांना काय सल्ला देत आहेत ते ही महत्वाचे आहे.दर कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी हे आपण पाहणार आहोत.सोयाबीनची आवक ही सुरवातीपासून कमीच राहिलेली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला 10 ते 15 हजार क्विंटलची आवक होत आहे.

मात्र, मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. अणखीन काही दिवस सोयाबीनची साठवणूक केली तर वाढत्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अणखीन काही दिवस शेतकऱ्यांनी दर वाढीची वाट पाहणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.

साठवणूकीचा होणार फायदा
हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला होता. काही शेतकऱ्यांनी तर यंदा प्रथमच शेती माल तारण योजनेचा फायदा घेतला होता. बाजारपेठेचे गणित कळल्याप्रमाणे शेतकरी हे उडीद व इतर

पिकांची विक्री करीत होते पण सोयाबीनच्या साठवणूकीवर भर देत होते. त्या दरम्यान, शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आताच्या दरावरुन निदर्शनास येत आहे.हंगाम सुरु होण्यापूर्वी सोयाबीनला जूनमध्ये 8 हजार 900 चा दर होता. मात्र, सोयाबीन काढणीच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे उत्पादनावर

त्याचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे दर गगणाला भिडणार असेच चित्र निर्माण झाले होते. शिवाय, मुहूर्ताच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आशा ऊंचावल्या होत्या. कारण मुहूर्ताच्या सोयाबीनला हिंगोली, बार्शी आणि अकोला बाजार समितीमध्ये 11 हजाराचा भाव मिळाला होता. मात्र, तो काही दिवसांपूरताच मर्यादीत राहिला होता.

त्यानंतर मात्र, ऑक्टोंबर महिन्यात तर सोयाबीनचे दर हे 4 हजार 800 वर येऊन ठेपले होते. या हंगामात शेतकऱ्यांनी उच्चांकी आणि सर्वात कमी असे दोन्हीही दर पाहिले आहेत. पण आता दरात सुधारणा होत असल्याने दिलासा मिळत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!