Friday, December 3, 2021

लसीकरण प्रमाणपत्र नसेल तर पगार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: शासकीय, निमशासकीय, औद्योगिक आस्थापनात असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना कोरोना लसीकरण बंधनकारक आहे. नोव्हेंबर महिन्याच्या वेतनबिलासमवेत ‘ लसीकरण प्रमाणपत्र ‘ असल्याशिवाय देयके पारित करण्यात येऊ नयेत, असे आदेश जालना जिल्हाधिकारी

डाॅ.विजय राठोड यांनी सोमवारी (ता.१५) जारी केले आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थिती पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबविण्यात आली. असे असले तरी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात काही प्रमाणात लसीकरण न करणाऱ्याची संख्या आहे.

राज्यात प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सरकारने ता.२६ ऑक्टोबरला जारी केलेल्या आदेशात लसीकरणाबाबत सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच औद्योगिक आस्थापना कार्यालयात लसीकरण आवश्यक करण्यात आले आहे. शासन आदेशात मास्क आणि लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. असे असले तरी प्रभावीपणे लसीकरण मोहिम राबविण्यासाठी संबंधित आस्थापनाना आता ‘ लसीकरण

प्रमाणपत्र ‘ देणे आवश्यक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की, शासकीय, निमशासकीय आस्थापनांनी नोव्हेंबर महिन्याच्या वेतन बिलासमवेत लसीकरण प्रमाणपत्र जोडणे आवश्यक केले आहे.

लसीकरण प्रमाणपत्र असल्याशिवाय वेतन बिले सादर करण्यात येवू नयेत, असेही आदेश जालना जिल्हाधिकारी डाॅ.राठोड यांनी जिल्हा कोषागार कार्यालयास दिले आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!