Wednesday, December 8, 2021

फेब्रुवारी, मार्चमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रसह देशात बऱ्याच प्रमाणात कोरोना नियंत्रणात आलेला आहे.दरम्यान तरीही दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेत अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. अनेकांना आपला रोजगार गमावा लागला.

यामुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागला. आता कुठे सर्व काही सुरळीत झालं आहे. त्यात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत म्हत्त्वाची बातमी आली आहे.पुढच्या तीन महिन्यांमध्ये कोरोनाची लाट येणार असल्याचं म्हंटलं जातंय.

फेब्रुवारी, मार्चमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र तिसरी लाट फारशी तीव्र नसेल. विषाणूचा प्रभाव कमी झाला तरी वातावरणात त्याचे अंश असतात. विषाणूविरोधात नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली असते.

त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करुन आणखी शक्तीशाली होतो. जोपर्यंत विषाणू वातावरणात आहे, तोपर्यंत कोरोनाचा धोका कायम आहे. रशिया, जर्मनी, चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक होतोय.

कोरोना संपला या भ्रमात राहून चालणार नाही. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर पटापट लसीकरण करायलाच हवं आणि सर्व नियम पाळायला हवेत अन्यथा कोरोनाचं तिसरं संकट अटळ आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!