Tuesday, November 30, 2021

उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कायम काम करतात हे सर्वांना माहीत आहे. राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा, असं विधान

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं.मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना सी. टी. रवी यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला.

आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे. फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांराखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. रोज वर्तमानपत्रात अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. हिंदूंना रोज अपमानित व्हावं लागत आहे.

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हिंदूंना नावं ठेवत आहे. रशीद अल्वीही हिंदूंवर टीका करत आहे. त्यांच्या सारखी शिवसेना आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार भ्रष्टाचारांचा अड्डा बनला आहे. हे सरकार महाविकास आघाडी नाही तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे.

जो पक्ष हिंदू रक्षण करण्यासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी झाला आहे. एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटुंबाची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच काम होत आहे, अशी टीका त्यांनी केली.महाराष्ट्राच्या विकासाचे काम होत नाही.

राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं. सत्तेतच यायचं असेल विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, असं आव्हान देतानाच 2019मध्ये जनतेने भाजपला मतदान केलं आहे. पण शिवसेनेने

लोकांचा कौल झुगारला. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधीसाधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. हा मतदारांचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!