भेंडा: राम कथेने सर्वांच्या जीवनात कल्याण होते .त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या कथेचा आनंद घेतला पाहिजे असे असे प्रतिपादन नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीराम कथेचे चौथ्या पुष्प गुंफताना नंदकिशोर महाराज नेवासेकर बोलत होते . श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज ,रामेश्वर महाराज कंटाळे ,अंकुश महाराज कादे ,अशोकराव मिसाळ,कल्याणराव म्हस्के,संभाजीराव माळवदे आदी यावेळी उपस्थित होते
नंदकिशोर महाराज नेवासेकर पुढे बोलताना म्हणाले की भगवान ज्या ठिकाणी प्रगट होतात ते ठिकाण पवित्र होऊन जाते .सध्याचे जाहिरातीचे युग आहे .सर्वांचे कल्याण करणारी राम कथा आहे .ज्याला जीवनात सुख आनंद मिळवायचा असेल त्यांनी भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांची गुण आत्मसात केले पाहिजे. आपल्या मुलांना गुरुकुल
पद्धतीने शिक्षण दिले पाहिजे ते शिक्षण अत्यंत श्रेष्ठ आहे गुरुकुल पद्धत ही खूप चांगली आहे. त्यामुळे मुलांना संस्कार चांगले मिळतात.परमार्थ मध्ये आनंद मिळत नसतो तो आपणच आपल्याला घ्यावा लागतो प्रत्येकाने आई-वडिलांची दर्शन घ्यावे रामायण हेच शिकवतं. अलीकडे कुटुंब व्यवस्था बिघडत चालली आहे आपल्या घरात आणि आपल्या मुलांना संस्कार खूप महत्त्वाचे आहे. आपल्या घरी साधुसंत महंत आले तर त्यांचा आदर सन्मान हा झाला पाहिजे.सत्य म्हणजे राम आहे आणि समर्पण म्हणजे लक्ष्मण आहे.
मनुष्याकडे अति सौंदर्य ,धन आणि बुद्धी हे माणसाचे गात करते पापा मधून मुक्त व्हायचे असेल तर परमार्थ भजन करणे गरजेचे आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलीला देवपूजा शिकवावी तसेच तुळशीला पाणी घालणे सांगावे .या दोन्ही गोष्टींला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे नंदकिशोर महाराज नेवासेकर यांनी सांगितले.
यज्ञ कुंडाचे वाटप
दक्षिण मुखी मारुती मंदिर परिसरात विविध विकास कामे चालू आहे .त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक भार हा मंडळावर येत आहे. भाविकांना राम कथेच्या चौथ्या पुष्पाच्या वेळी यज्ञ कुंड म्हणून एक देणगी डब्बा हा भाविकांना देण्यात आला .