Friday, December 3, 2021

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना 105501 व्या साखर पोत्याचे पूजन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/Newasa

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सुरू असलेल्या सन 2021-22 च्या गळीत हंगामात उत्पादित केलेल्या 1 लाख 5 हजार 501 व्या साखर पोत्याचे पूजन
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व संचालक मच्छीन्द्र म्हस्के यांचे हस्ते करण्यात आले.

कारखान्याचा या वर्षीच्या गळीत हंगामाला 25 ऑक्टोबर पासून सुरूवात झाली. दि.15 नोव्हेंबर अखेर 22 दिवसात कारखान्याने 1 लाख 32 हजार 240 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1 लाख 5 हजार 501 क्विंटल(पोते) साखर उत्पादित केली.मंगळवार दि.16 नोव्हेंबर रोजी या साखर पोत्याचे पूजन
अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,विठ्ठलराव लंघे,काकासाहेब नरवडे,काशीनाथ नवले,काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले,डॉ.नारायणराव म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे,जनार्दन कदम, बबनराव भुसारी,दीपक नन्नवरे, शंकरराव पावसे,सखाराम लव्हाळे,
विष्णूपंत जगदाळे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी,तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरकुटे,एस.डी.चौधरी, मुख्य अभियंता राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,
बँक अधिकारी अनिल विधाटे,उपमुख्य अभियंता रमेश मोटे,के.एन.गायके,जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,स्थापत्य अभियंता सुधाकर ढाकणे, साखर विक्री विभागाचे दत्तात्रय चिमणे,अशोक मते,कल्याण जांभूळकर आदी उपस्थित होते.

——— चौकट————

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली…

दिवंगत थोर इतिहासकार, पद्मविभूषण,  महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाचे सभेत उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.
———————————————

 

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!