Wednesday, December 8, 2021

सरपंच सतीश निपुंगे यांनी दिले कल्पवृक्ष सोसायटीतील रहिवाशांना स्वतःच्या बोअरचे पाणी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

मुकींदपूर ता.नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटीतील रहिवाशांना सरपंच सतीश निपुंगे यांनी विना मोबदला स्वतःच्या कुपनलिकेचे (बोअर) पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने, कल्पवृक्ष सोसायटीतील रहिवाशांनी रविवारी सतीश निपुंगे,महेश निपुंगे यांचा शाल, हार, श्रीफळ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी संतोष खंडागळे होते.

कल्पवृक्ष सोसायटीला पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विकासकाची असताना. त्यांनी हात झटकल्याने.येथील रहिवाशांचे पाण्यावाचून चार वर्षे हाल झाले. येथील रहिवाशांनी विकासकाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी विनंती केली. कल्पवृक्ष सोसायटीत पाणी टंचाई असल्याचा फलक इमारतीवर लावून. आम्ही फसलो तुम्ही फसू नका.असे अनोखे आंदोलन केले. परंतु फायदा झाला नाही. कल्पवृक्ष सोसायटीला गेल्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व आता कायम पाण्याची सोय निपुंगे बंधूंनी करून दिली.

यावेळी भाऊसाहेब गुंजाळ, पत्रकार बाळकृष्ण पुरोहित, डॉ. अविनाश काळे, कल्याण मुरूमकर, कल्याण शेजूळ आदिंनी मनोगत व्यक्त करताना सरपंच सतीश निपुंगे व महेश निपुंगे यांचे आभार मानत यापुढे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना सतीश निपुंगे म्हणाले कल्पवृक्ष सोसायटीला यापुढे वैयक्तिक व ग्रामपंचायत पातळीवर कायम सहकार्य राहील.

कार्यक्रमास सोपान गायकवाड, संदीप वाखुरे, किरण झिणे, हरिभाऊ मते, विठ्ठल उंदरे,तुळशीराम गायकवाड, चंद्रशेखर गुंजाळ, अनिल तट्टू, डॉ. ज्ञानेश्वर काळे, विकास जवरे, पंकज राठोड, विजय पवार, संतोष खाटीक, भाग्येश पाटील, शिवाजी गाढे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शैलेश पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार निखिल देवतरसे यांनी मानले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!