Saturday, November 27, 2021

नितेश राणेंचा शिवसेनेच्या या नेत्यांवर गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रझा अकादमीने नांदेडमध्ये आयोजित केलेल्या आंदोलनाविरोधात कारवाई कऱण्याची मागणी करत अर्जुन खोतकर यांनी रझा अकादमीच्या

मंचावर भडकाऊ भाषण केल्यामुळे अमरावतीमध्ये दंगली झाल्या असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.यांसदर्भात नितेश राणे यांनी अर्जुन खोतकर आणि रझा अकादमीच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात यावी असं पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.

तसंच पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून अर्जुन खोतकर यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत या वादग्रस्त भाषणामुळेच हिंसा झाल्याचे म्हटलं आहे.भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनीही उत्तर दिलं आहे. ‘

या फुटाण्या-शेंगदाण्याला काही काम राहिलं नसून हे किती बेअकली लोक आहे हे यावरून समोर आल्याचं’ खोतकर यांनी म्हटलं आहे. आपण नांदेडला गेलोच नसल्याचं खोतकर यांनी म्हटलं आहे. मी जालन्यातील रजा अकादमीच्या मोर्चात जाऊन तिथे शांतता आणि सलोखा

राहण्याचं आवाहन केलं असंही खोतकर म्हणाले.मी नांदेडला गेलोच नव्हतो असा निरोप त्यांना समजल्यानंतर आता भाजप नेते तोंडघाशी पडले असून भाजपच्या लोकांना जालन्यात घुसू न दिल्यानं जालन्यात दंगल झाली नाही अन्यथा जालन्यात देखील अमरावती सारखी दंगल झाली

असती असं सांगायला देखील खोतकर विसरले नाहीत. जान्यातल्या मोर्चात मी असल्यानं दंगल झाली नाही ही भाजपची खरी पोटदुखी आहे असा टोलाही खोतकर यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!