Tuesday, November 30, 2021

कोरोनावरील लस घेतली नाही अशा व्यक्तींना बसणार फटका कारण…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नमकीनसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या रतलामच्या नमकीन खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. जर तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत, तर तुम्हाला कोणत्याही दुकानातून नमकीन मिळणार नाही . लसीकरणासाठी रतलामच्या या अनोख्या उपक्रमाची देशभर चर्चा होत आहे.

कोरोनाच्या लसीकरणाबाबत लोकांची उदासीनता पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, प्रशासनाला लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात मोठी अडचण येत होती. त्यामुळे प्रशासनाने शहरातील अनेक व्यापारी संस्थांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.

विशेषत: खाद्यपदार्थांच्या दुकानातील व्यापाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस मिळालेल्या ग्राहकांनाच माल देण्यास सांगण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनावरून शेव-मिठाईच्या व्यापाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या लोकांना शेव-नमकीन विकू नये, असा निर्णय घेतला.

प्रशासनाने विवाह सोहळ्याबाबतही कडक कारवाई केली आहे. लग्न समारंभात, कोरोनाची लस न घेतलेल्या लोकांसाठी लग्न समारंभाच्या ठिकाणी स्वतंत्र स्टॉल उभारला जात आहे, जिथे लस नसलेल्या लोकांना आधी लसीकरण केले जात आहे.

अन्यथा लग्न समारंभात सामील होऊ दिले जात नाही. याशिवाय लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापणाऱ्या प्रिंटर वाल्यांना प्रत्येक कार्डावर लसीकरण न झालेल्यांनी लग्नाला येऊ नये, असे आदेशही प्रशासनाने दिले आहेत

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!