Tuesday, November 30, 2021

ऑनलाइन पैसे पाठवताना तुम्ही ‘या’ चुका करता तर ते टाळा, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: काही वर्षांपूर्वी पैसे काढण्यासाठी व पाठवण्यासाठी बँकेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे सहज घरबसल्या मोबाइलद्वारे पैसे पाठवू शकता. मात्र,

स्मार्टफोनमुळे पैसे पाठवणे जेवढे सोपे झाले आहे, तेवढेच धोकादायक आहे.ऑनलाइन पैसे पाठवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण, एका चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. ऑनलाइन पैसे ट्रांसफर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्याबाबत जाणून घेऊया.

बँक डिटेल
पैसे पाठवताना आपण एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर करत असतो. अशावेळी बँकेची माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. बँकेची माहिती भरल्यानंतर ती पुन्हा पुन्हा तपासावी, अन्यथा एका छोट्या चुकीमुळे पैसे इतरांच्या खात्यात जाऊ शकतात व नुकसान होईल.

अकाउंट नंबर तपासा
अनेकदा लोक अकाउंट नंबर टाकताना चुका करतात. अकाउंटचा एक नंबर देखील चुकल्यास पैसे दुसऱ्याच खात्यात ट्रांसफर होतात. अशा स्थितीत तुम्हाला वारंवार बँकेच्या चक्करा माराव्या लागू शकतील.

आयएफएससी कोड
प्रत्येक बँकेच्या ब्रँचचा एक आयएफएससी कोड असतो. ऑनलाइन पैसे ट्रांसफर करताना या कोडची गरज भासते. त्यामुळे ऑनलाइन पैसे पाठवताना योग्य आयएफएससी कोड आणि अकाउंट नंबर टाकणे अत्यंत गरजेचे आहे.
मोबाइल नंबर फोनवर अनेक

अ‍ॅप्स उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही पैसे ट्रांसफर करू शकता. मोबाइल नंबरचा वापर करून देखील पैसे पाठवता येतात. त्यामुळे चुकीचा मोबाइल नंबर टाकल्यास दुसऱ्याच व्यक्तीपर्यंत पैसे पोहचतील. त्यामुळे माहिती भरताना दोन-तीन वेळा नक्की तपासा.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!