Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकींग :विहिरीत उडी घेवून युवकाची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील युवकाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. गोविंद सटाले (वय 27 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

गोविंद हा नगर येथे नोकरी करत होता. या घटनेने निमगाव गांगर्डामध्ये शोककळा पसरली आहे. त्याने आपल्या मालकास मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली. त्यामध्ये घरच्या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक तसेच आत्महत्या करणार असल्याचे ठिकाण लिहिले होते.

दिलेल्या क्रमांकावर नातेवाईकांना संपर्क करण्यास सांगून गोविंदने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक रवींद्र वाघ, वैभव सुपेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. विहिरीला पाणी असल्याने मृतदेह विहिरीबाहेर

काढण्यास ग्रामस्थांना अडचणी येत होत्या. शेवटी पथकास पाचारण करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर निमगाव गांगर्डा येथे शोकाकूल वातावरणात गोविंदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!