Wednesday, December 8, 2021

मोठी घडामोड: काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज दिल्लीचे माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. नवी दिल्लीत एका भव्य कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. योगानंद शास्त्री

ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून दिल्लीतील यापूर्वीच्या शीला दीक्षित सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. गेल्या काही दिवसांपासून योगानंद शास्त्री यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी चर्चा सुरु होती. आज 17 नोव्हेंबर रोजी या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

योगानंद शास्त्री आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत या कार्यक्रमात शरद पवार यांनी केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाच्या राजधानीत योगानंद शास्त्री यांच्यासारख्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. आज केंद्रात भाजपच्या सरकारमुळे अनेक

सांप्रदायिक शक्तींनी अराजकता मांडली आहे. अशा स्थितीत जनतेला व्यक्त होण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. योगानंद शास्त्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेशी चर्चा करावी, जनतेला असं व्यासपीठ निर्माण करून द्यावं. जेणेकरून समाजात शांतता आणि एकजूट नांदेल.

योगानंद शास्त्री यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याचा मला आनंद होत आहे, त्यांचं पक्षात मी स्वागत करतो, ‘ अशा शब्दात शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेले योगानंद

शास्त्री हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. योगानंद शास्त्री यांनी आतापर्यंत तीन वेळा दिल्ली विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. 2008-2013 पर्यंत ते दिल्ली विधानसभा अध्यक्ष होते. शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा विकास, अन्न व नागरि पुरवठा मंत्री होते.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!