Tuesday, November 30, 2021

नेवासा पोलीसांकडुन दोन वर्षापुर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींनाअटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

दोन वर्षापुर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना नेवासा पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबदची अधिकची माहिती अशी की,दि- २३.०६.२०१९ रोजी अशोक कारभारी पुंड (वय ३४ वर्षे) धंदा कामगार पोलीस पाटील जळके बु रा-जळके बु ता-नेवासा यांनी प्रवरासंगम दुरक्षेत्र येथे हजर होवुन खबर दिली कि-जळके बु शिवारात अहमदनगर ते औरंगाबाद हायवे रोडलगत कोतकर यांच्या बंद पडलेल्या हॉटेल समोर एक अनोखळी पुरुष जातीचे वय-३५ वर्षे वयाचे प्रेत पडलेले आहे. त्यावरुन नेवासा पोलीस स्टेशन आकस्मात मयत क्र. ५३/२०१९ सीआरपीसी-१७४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर आकस्मातचा तपास प्राथमिक तपास पोना / १६७५ एम एच कचे तसेच पोहेकॉ/१९३४ के आर साळवे यांनी केला आहे.

नमुद आकस्मातच्या अनुषंगाने मयत याची ओळख पटवुन सदर मयताचे नाव अशोक साहेबराव उबाळे वय-35 वर्षे रा-वरखेड म्हसोबा ता-गंगापुर जि-औरंगाबाद असे असलेचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान मयताची पत्नी हीने दोन संशयीत इसमावर घातपाताचा संशय व्यक्त केला होता. परंतु सदरचा गुन्हा हा हायवे रोड लगत घडला असलेने तो अपघात कि घातपात याबाबत शंका निर्माण होत होती. संशयीत इसमांच्या अनुषंगाने गोपनिय यंत्रणा सतर्क करुन त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा मयताच्या मरणाबाबतचा अहवालाचे सखोल अवलोकन करता यातील मयतास कोणत्यातरी टणक हत्याराने मारहाण झालेबाबत चौकशी अंति निष्पन्न झाले आहे. आकस्मात मयतच्या चौकशीअंती तसेच वैद्यकीय पुराव्याच्या आधारे पोहेकॉ/ 1934 के आर साळवे नेवासा पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादी वरुन आरोपी नामे १) कृष्णा उर्फ यमराज बापु वाघ वय-२८ वर्षे धंदा-शेती रा-वरखेड म्हसोबा ता-गंगापुर जि-औरंगाबाद २) भाउसाहेब उर्फ पिंटु सुर्यभान खैरनार वय-३३ वर्षे धंदा-शेती/ विहीरीचे आडवे बोअर रा- गारखेडा ता-येवला जि-नाशिक यांचे विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 868/2021 भादवी-302.201.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद दोन्ही आरोपीतांना अटक केली असुन आरोपीतांची मा न्यायालयाने पोलीस कोठडी मंजुर केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोसई एस व्ही भाटेवाल हे करत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल,अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोसई समाधान भाटेवाल, पोहेको कैलास साळवे, पोना अशोक कुदळे, बबन तमनर, भागवत शिंदे, पोकॉ अंबादास गिते, केवज रजपुत यांनी केली.

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!