Wednesday, December 8, 2021

महाराष्ट्रात पहिली ते चौथीच्या शाळा होणार सुरु?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळं सध्या बंद असलेल्या पहिले ते चौथी पर्यंतचे वर्ग येत्या काळात सुरु होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळते.

या बैठकीला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित होते.मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. सध्या राज्यात शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु आहेत. तर ग्रामीण भागात

पाचवीपासून बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सध्या राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्यानं आता पहिलीपासून पुढील सर्व वर्ग सुरु करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागही प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतू, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर येत्या १५ दिवसांत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!