Saturday, November 27, 2021

आनंदवार्ता : सोयाबीन 6 हजाराच्या पार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीपूर्वी शेतकऱ्यालाच काय पण व्यापाऱ्यांना देखील सोयाबीनच्या दरात एवढ्या झपाट्याने वाढ होईल असे वाटत नव्हते. बाजारपेठेत सर्वकाही नकारात्मक चित्र तयार झाले होते. कधी नव्हे ते शेतकऱ्यांना शेती माल तारण योजनेचा

लाभ घेऊन सोयाबीनची साठवणूक करावी लागली होती. मात्र, आता सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे. बुधवारी तर लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सौद्यामध्ये 6 हजार 92 रुपये

असा दर मिळाला आहे तर पोटलीत सोयाबीनला 5750 चा दर मिळाला आहे.हगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला बाजारात उठाव नव्हता. यातच पावसामुळे उत्पादनात तर घट झालीच होती पण दर्जाही ढासळल्याने दर घटत होते. दिवाळीपूर्वी सोयाबीनला 4800 रुपये

 प्रति क्विंटल दर होता. आता यामध्ये तब्बल 1 हजाराने वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठाही मर्यादित असल्यानेच सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आज (बुधवारी) सलग आठव्या दिवशी दरात वाढ झालेली आहे.सोयाबीनचे दर कमी

असतानाही आणि आता वाढल्यानंतरही शेतकऱ्यांनी सर्वकाही संयमाने घेतलेले आहे. दोन आठवड्यापूर्वी सोयाबीनला दर नव्हते तेव्हाही शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता तर आता दर वाढूनही मोठ्या प्रमाणात आवक केली जात नाही. सध्या दर वाढले

 असताना आवक वाढली तर याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठेचे गणित कळाले असून आता दर वाढले तरी टप्प्याटप्प्यानेच सोयाबीनची आवक केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!