Friday, December 3, 2021

आता तुमच्या जमिनीचाही असणार आधार सारखा युनिक नंबर;मोदी सरकारचा कार्यक्रम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत जमिनींसाठी एक वेगळा नोंदणीकृत क्रमांक जारी करण्याच्या तयारीत आहे. या कार्यक्रमांतर्गत जमिनीच्या कागदपत्रांच्या सहाय्याने त्यांच्या नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जातील.

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, मार्च 2023 पर्यंत संपूर्ण देशात जमिनीची डिजिटल नोंद करण्याचे ध्येय आहे. त्यामुळे आता तो दिवस दूर नाही जेव्हा संपूर्ण देशात आधार कार्ड क्रमांकाप्रमाणेच जमिनीचाही 14 अंकी अद्वितीय क्रमांक

असेल, जो रजिस्ट्री ऑफिस, बँक आणि रेकॉर्ड रूमशी जोडला जाईल.युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच ULPIN सिस्टममध्ये प्रत्येक प्लॉटसाठी 14 अल्फा-न्यूमेरिक युनिक आयडी असेल. या क्रमांकाच्या मदतीने कोणत्‍याही व्‍यक्‍तीला

त्‍याच्‍या जमिनीचे रेकॉर्ड किंवा नकाशे कोठूनही सहज मिळू शकतील. या डिजिटल लँड रेकॉर्डमुळे अनेक फायदे होतील. याबाबत गिरीराज सिंह यांनी 3 C फॉर्म्युला दिला, ज्याअंतर्गत सेंट्रल ऑफ रेकॉर्ड, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड, कन्व्हिनियन्स ऑफ रेकॉर्डचा सर्वसामान्यांना खूप फायदा होईल. यामुळे जमिनीचे

व्यवहार सहज होतील आणि जमिनीचा कोणताही वाद लवकर निकाली निघण्यास मदत होईल.डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत डिजिटल जमिनीच्या नोंदी तयार केल्या जात आहेत. डिजिटल जमीन अभिलेख तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहेत.

म्हणजेच येत्या काही दिवसांत फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला मिळेल. त्याच्या अंमलबजावणीमुळे, मालमत्तेची नोंदणी करणे देखील सोपे होईल, कारण त्यामुळे तुमच्या सरकारी कार्यालयांच्या अनेक फेऱ्या वाचतील. जमीन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, फक्त

एक किंवा दोनदाच तुम्हाला सरकारी कार्यालयात जावे लागेल.दरम्यान, जमिनीच्या प्रश्नामुळे अनेकदा भावांमध्ये वाद आणि इतर अनेक समस्या निर्माण होतात. आता अशा डिजिटल रेकॉर्डमुळे सर्वप्रथम जमिनीची खरी स्थिती कळणार आहे. कारण जमिनीचे मोजमाप ड्रोन कॅमेऱ्याने होणार आहे. बिहार, हरियाणा, झारखंड,

ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि गोवा येथे त्याची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे. अहवालानुसार, या प्रणालीचा वापर करून 25 लाखांहून अधिक दस्तऐवजांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!