Saturday, November 27, 2021

बापरे:पत्नीचा अश्लिल व्हिडीओ बनवून पतीकडून उकळले पैसे अन् पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोशल मीडियावर बायकोचे फोटो मॉर्फ करुन त्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करुन तिच्या पतीकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत

फिर्यादीकडून ४५ हजार रुपये उकळले आहेत. राहुल यादवं असं आरोपीचं नाव असून फिर्यादीने त्याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.फिर्यादी तरुण हा एका मोबाईल कंपनीच्या फायबर ऑप्टिकलमध्ये कामाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी राहुल यादवचा फिर्यादीला फोन आला. यावेळी आरोपीने फिर्यादीला आमच्याकडे सेक्स करण्यासाठी महिला उपलब्ध आहेत, तुम्हाला हवी असल्यास कळवा असं सांगितलं. फिर्यादीने या फोनला प्रतिसाद दिला नाही.

यानंतर आरोपीने काही वेळात पुन्हा एकदा फिर्यादीच्या मोबाईलवर काही तरुणींचे फोटो व्हॉट्स अप केले. काही वेळाने आरोपेनी फिर्यादीला पुन्हा फोन करुन तुमच्या आवडीची मुलगी बुक केली असून हॉटेलमध्ये रुमही बुक झाल्याचं कळवलं.

इतकच नव्हे तर आरोपीने फिर्यादीला पेटीएम करण्यासाठी एक नंबरही पाठवला. परंतू आपण असं कोणतही काम केलेलं नसल्याचं फिर्यादीने सांगताच आरोपीने कोणतीही गोष्ट ऐकून न घेता रुम बुक केल्याचे १५ हजार पाठवण्याची धमकी दिली.

तरीही फिर्यादीने पैसे न दिल्यामुळे आरोपीने फिर्यादीच्या पत्नीचे फेसबुकवरील काही फोटो मॉर्फ करुन त्याचा एक अश्लिल व्हिडीओ बनवला.हा व्हिडीओ फिर्यादीला पाठवून ४५ हजार रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल केला जाईल अशी धमकी दिली. सुरुवातीला बदमानीला घाबरुन फिर्यादीने आरोपीला ४५ हजार रुपये दिले.

परंतू यानंतरही आरोपीकडून होणारा त्रास कमी होत नसल्यामुळे त्याने अखेरीस पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजारामपुरी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!