Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील प्रकार:फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली त्यांने स्विकारली त्यानंतर दोघात मैत्री झाली पुढे सुरू झाले असे काही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फेसबुकवर त्याला अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती खातरजमा न करता स्विकारलीही. त्यानंतर दोघात मैत्री झाली. व्हाट्सअपवर तर कधी फोनवर बोलणे सुरू झाले. मग तिकडून ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याची विनंती केली. विनंतीला प्रतिसाद देत लाखो रुपयांची गुंतवणूक केली अन् तिथेच घात झाला!

पैसे तर गेलेच शिवाय आत्महत्या करून त्रास दिल्याची चिठ्ठी लिहून ठेवण्याची धमकीही देण्यात आली. शेवटी फसवणूक झालेल्याने पोलिसांकडे धाव घेतली. फसवणूक करणाऱ्याचा अद्याप ठावठिकाणा नाही. राहुलकुमार श्रीधर राऊत (मुळगाव गडहिंग्लज, कोल्हापूर) सध्या नोकरीनिमित्त (रा. राशीन ता. कर्जत) यांना

 राहुल नामदेव कवाडे (रा. आवळे बुद्रुक ता. राधानगरी जि. कोल्हापूर) याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली व बोलणे सुरू झाले. मैत्रीचा फायदा घेत कवाडे याने फिर्यादिस ‘मी ट्रेडिंग सुरू केले असून कोणी गुंतवणूक करणार असेल तर सांगा. १ लाखाला प्रतिदिवसाला

मी ५ हजार देतो आणि रक्कम जेव्हा परत हवी असेल तर लगेच परत देतो’ असे सांगितले. बँक अकाऊंटची माहितीही पाठवली. ‘तुम्ही २ लाख ३० हजार गुंतवा, मी दररोज २० हजार तुम्हाला देत जाईल. जेव्हा सर्व रक्कम लागेल, तेव्हा परत करील. मी कुणालाही फसवले नाही’, असे म्हणत विश्वास संपादन केला.

यावर विश्वास ठेवत राऊत यांनी एकूण २ लाख ३० हजार रुपये स्वतःच्या व आईच्या खात्यावरून आरोपीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर कवडे याने मोबदला म्हणून फिर्यादीच्या आईच्या खात्यावर तीन वेळा मिळून ५२ हजार रुपये दिले. त्यानंतर मात्र पैसे देण्यास विलंब झाला. ‘मी शेअर मार्केटचा कोर्स

करण्यासाठी पुण्याला जाणार आहे, वडिलांची तब्बेत खराब आहे,’ अशी कारणे देत मोबदला दिला नाही. त्यानंतर राऊत यांनी गुंतवलेले २ लाख ३० हजार रुपये परत मागितले असता टाळाटाळ केली. त्यानंतर राऊत यांचा नंबरही त्याने ब्लॉक केला.

राऊत व त्यांच्या पत्नीने हा सर्व प्रकार आरोपी कवडे याच्या पत्नीला फोनवर सांगितला. त्यानंतर कवडे याने फिर्यादीच्या व्हाट्सअपवर चुकीच्या पद्धतीने मेसेज केले. यापूर्वीही राऊत यांनी गुंतवणुकीचे पैसे मागितले असता ‘मी आत्महत्या करतो आणि सुसाईड नोटवर तुझे नाव लिहितो. पुन्हा मला व माझ्या बायकोला

कॉल केला तर खोटा गुन्हा दाखल करून फसवतो ‘अशी धमकी दिली. शेवटी राऊत यांनी पोलिसांत धाव घेतली. कर्जत पोलिसांनी आरोपी राहुल कवाडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!